वीट येथील कुंटनखाना प्रकरणातील आरोपींना जामीन मंजुर
करमाळा
वीट ता.करमाळा येथील संशयित आरोपी यांच्यावर गु.र. नंबर 340/2025 अन्वये अनैतिक महिला व मुलींच्या व्यवसायिक लैंगिक तस्करी कायद्याअंतर्गत कलम 3,4 व 5 तसेच BNS 2023 कायद्यांतर्गत कलम 143(2),144(2) अन्वये करमाळा पोलीस स्टेशन येथे दिनांक 4/5/2025 रोजी गुन्हा नोंदविण्यात आलेला होता त्यातील आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये बनावट गिऱ्हाईकाच्या साह्याने पोलिसांनी संबंधित ठिकाणी रेड टाकून एक संशयित आरोपी व बंद खोलीतील असलेल्या एका आरोपीसह तीन महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यामधील आरोपीला 4 मे. 2025 रोजी अटक झाली होती. यातील आरोपीचा अटक जामीन अर्ज बार्शी येथील मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालया येथे ठेवला होता. संशयित आरोपींवरती अनैतिक महिला विषयी ध्येय व्यापार केल्याबद्दलचा आरोप होता.
आरोपीच्या वकिलांनी मे. जिल्हा न्यायालयासमोर पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामधील तपासाच्या आधारे आरोपीचा त्या व्यवसायाशी कुठलाही संबंध नाही हे मे.न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन युक्तिवाद सादर केला मे.कोर्टाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन हा दिनांक 29/7/2025 रोजी अटी व शर्तीवरती मंजूर केला. आरोपीतर्फे एडवोकेट नितीन पाटील तसेच अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.

