अत्याचार व विनयभंग प्रकरणातील संशयीतास जामीन मंजुर
करमाळा समाचार
तालुक्यातील पोंधवडी येथील संशयित आरोपी तात्या खरात यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यावर 376, 354 A, 506 कलमान्वये दि 1 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, तात्या याने 20 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास शेतात येऊन आपल्या घरच्यांना मारण्याची धमकी देत अत्याचार केला तसेच एक मार्च रोजी सकाळी हात पकडण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद महिलेने केली होती. त्यानंतर तात्या खरात याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी आरोपीतर्फे ॲड. राजु शेख, ॲड. आकाश मंगवडे यांनी बाजू मांडली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामीन अर्जाला यातील मुळ फिर्यादी तर्फे सरकारी पक्षाने जामीन होणेस विरोध केला व त्या जमीन अर्ज वर आरोपीतर्फे ॲड.राजू शेख , ॲड.आकाश मंगवडे यांनी युक्तीवाद करून सदरचा अर्ज मंजूर करून घेतला आहे.