करमाळासोलापूर जिल्हा

सर्पदंश झालेल्या शेतकरी मजूर महिलेच्या मदतीला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आला धावून

करमाळा (प्रतिनिधी)


शेलगाव( क ) येथील शेतकरी महिला रेश्मा संतोष मोहिते वय 27 यांना काल रात्री अत्यंत विषारी सर्पाने चावा घेतला. रात्री सर्पदंश झालेल्या या महिलेला करमाळ्यातील डॉक्टरांनी उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात असे सांगितल्यानंतर तिला भिगवण येथील भिगवन हेल्थ क्लियर सेंटर मध्ये ऍडमिट करण्यात आले.

*करमाळा तालुक्यातील रणरागिणीचा पोलीस खात्यात डंका ; सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानीत*
https://karmalasamachar.com/karmalas-heroines-sting-in-the-police-department-awarded-the-best/

यावेळी डॉक्टरांनी जवळपास 50 इंजेक्शन्स लागतील असे सांगितले. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळाशी संपर्क साधला. यावेळी कक्ष प्रमुख दीपक पाटणे, नागेश शेंडगे, राजेंद्र मेरगळ, मारुती भोसले, शुभम मोहिते यांनी प्रयत्न करून तात्काळ त्यांना 15 इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

*तालुक्यातील आठही ग्रामपंचायत मध्ये चुरशीने मतदान ; सर्व ग्रामपंचायत मतदान आकडेवारी*
https://karmalasamachar.com/heavy-polling-in-all-eight-gram-panchayats-of-the-taluka-all-gram-panchayat-polling-statistics/

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा येथून आवश्यक ती मदत रुग्णांना केली जात असून इमर्जन्सी मध्ये या शेतकरी महिलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अत्यंत महागडी अशी 15 इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. सर्पदंश झालेली महिलेची प्रकृती आता सुधारत सुधारत आहे.

प्रत्येकी 7000 रुपये किमतीची 50 इंजेक्शन घेऊन या असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही हतबल झालो होतो. मात्र शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 15 इंजेक्शन उपलब्ध झाले असून उर्वरित इंजेक्शन सुद्धा पुरवठा करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली आहे याचे आम्हाला समाधान आहे. आमच्यासारख्या गरीब रुग्णाला एका फोनवर एवढी मदत मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आम्हाला पांडुरंग भेटला आहे.
-विनोद विशंभर रणदिवे
सर्पदंश झालेल्या महिलेचा भाऊ

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE