वीट येथील खून प्रकरणी पत्नीसह सासरा व मेव्हणा यांना जामीन मंजूर
करमाळा –
सासरवाडीला पत्नीसह गेलेला मुलगा माघारी आला नाही त्याचे मृत शरीर मिळुन आले. त्याच्या मृत्युला जबाबदार धरुन सुन, मुलाचा सासरा व मेव्हण्यावर मुलाच्या वडीलांनी गुन्हा दाखल केला होता त्या प्रकरणात आता पत्नीसह सासरा व मेव्हण्याला दिलासा मिळाला असुन जामीन मंजुर झाला आहे. सदरचा प्रकार दि १२ नोव्हेंबर २०२३ मध्ये घडला होता. तेव्हा पासुन तीघे अटकेत आहेत.

वीट ता.करमाळा येथील पत्नी, सासरा व मेव्हणा यांच्यावर दिनांक सदरच्या घटनेत नोव्हेंबर २०२३ रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये एकूण पाच संशयीत आरोपी वरती गुन्हा दाखल होता. त्यामधील दैवजित पवार,
जब्या पवार, कीर्ती काळे या आरोपीना नोव्हेंबर २०२३ रोजी अटक झाली होती. अटक आरोपी हे मयताचे सासरे मेहुना व पत्नी होते.
तसेच पत्नी बरोबर तिचे लहान तीन वर्षाचे मुल हे कोल्हापूर येथील जेल मध्ये नोव्हेंबर २०२३ पासून होते. तसेच आरोपी दैवजित व जब्या हे करमाळा येथील जेलमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून होते. यांचा जामीन अर्ज बार्शी येथील मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. अटक आरोपींनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.

संशयित आरोपींवरती खून केल्याबद्दलचा आरोप होता. आरोपीच्या वकिलांनी मा. उच्च न्यायालयासमोर पोलिसांनी दोषारोप पत्रामध्ये दोन जणांची घेतलेली साक्ष हे कशाप्रकारे चुकीचे व प्रदीर्घ आहेत हे मे. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन युक्तिवाद सादर केला मे. कोर्टाने आरोपींच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून या तीघांचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. भाग्यश्री अमर शिंगाडे- मांगले यांनी काम पाहिले.