प्रहार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी बापू तळेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बापू वाडेकर यांची निवड – सर्वपक्षीय सन्मान
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्यामध्ये सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने प्रहार जनशक्ती संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने प्रहार जनशक्ती संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी बापु नेते तळेकर यांची व स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्षपदी बापु वाडेकर यांची निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर शेतकरी कामगार संघटनेचे दशरथ आण्णा कांबळे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे,प्रहार जनशक्ती संघटना तालुका अध्यक्ष संदीप तळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष संतोष वारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुका अध्यक्ष समाधान फरतडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे तालुका उपाध्यक्ष बापु फरतडे , शिवसेनेचे बंडु शिंदे, मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे,रिटेवाडी योजना संघर्ष समितीचे शहाजी माने, सोलापूर जिल्हा नेते गणेश मंगवडे गोपीनाथ पाटील सर यांच्या हस्ते उपस्थितीत नुतन पदाधिकारी बापु तळेकर बापू वाडेकर यांचा शाल हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.करमाळयात सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सत्कार करुन शुभेच्छा दिल्याबद्दल सामाजिक समरसतेचे दर्शन घडविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
