सावधान …दत्तमंदीरापासुन एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले
करमाळा समाचार
सावधान आत्ताच करमाळ्याच्या दिशेने दोन अनोळखी चोरटे मोटरसायकलवर गेले आहेत. त्यांनी दत्त मंदिराजवळ एका महिलेचे गळ्यातील गंठण चोरून नेल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. जेऊर रोड येथील दत्त मंदिरात एक महिला देवदर्शनासाठी आलेले असताना दोन अनोळखी इसम ज्यांनी हेल्मेट घातले आहे असे तेथे आले व गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेऊन गेले आहेत.

सदरची महिला ही प्रतिष्ठित सोने व्यापारी यांच्या घरातील असून ती देवदर्शनानिमित्ताने साडेसहाच्या सुमारास दत्त मंदिर परिसरात आलेली होती. त्या ठिकाणी अनोळखी चोर आधीच थांबले असावेत असा संशय आहे. गळ्यातील भारदस्त असे सोन्याचे गंठण पाहून त्यांनी ते हिसकावले व तेथून पळून गेले आहेत. या गोष्टीचा गाजावाजा होण्यापूर्वी त्यांनी करमाळ्याच्या दिशेने गेले आहेत.
