करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भाई जे बोलतो तेच करतो , हमारे जैसा कोई नही ; बारामती खुन प्रकरण – दहशत माजवण्याचा प्रयत्न

करमाळा समाचार

“एस बी भाई जे बोलतो ते करतो”, एस बी बॉस, हमारे जैसा कोई नही अशा आशयाचे मेसेज टाईप करुन समाज माध्यमातून बारामती येथील ओंकार पोळ याच्या खुनाचे समर्थन करणारे मेसेज व्हायरल केले जात आहेत. सदरचे मेसेज अल्पवयीन मारेकऱ्यांच्या फोटोसह टाकले जात आहेत. हे मेसेज एस बी टोली या टोळीच्या मुलांकडुन टाकले जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिसतय तेवढे सोपे नाही संशयीत आरोपी अल्पवयीन असले तरी त्यांच्या डोक्यात टोळी आणि दहशत माजवणे असा हेतु दिसुन येतोय.

बारामती येथे टीसी महाविद्यालयात करमाळा तालुक्यातील बारावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकार पोळ याचा त्याच्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या दोन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने खुन केला आहे. सदरचा खुन शाळेतील शुल्लक कारणातुन झाल्याचे सांगण्यात आले. पण ओंकार वर हल्ला करण्यापुर्वी त्याच्या खुनाचा कट व धमकी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

तर सध्या समाजमाध्यमात व्हायरल मेसेज मुळे त्याला दुजोरा मिळत आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी त्यांचा ओढा मात्र तिकडे दिसुन येत आहे. अल्पवयीन मुलांकडुन गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पणाचे हे पहिले पाऊल असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात असे प्रकार घडत असतील तर चिंतेची बाब आहे.

ads

एस बी बॉस, ३०२ किंग अशा प्रकारची नावे सोशल माध्यमातून अकाउंटला वापरण्यात आले आहेत. यातून संबंधित मुलांना गुन्हेगारी जगताचे आकर्षण असल्याचे दिसून येते. त्यांनी टाकलल्या डायलॉगला पसंतीतर मिळतच आहे शिवाय खुनाच्या घटनेलाही मोठी कामगिरी केल्यागत शाबासकी देत आहेत. समाजमाध्यामातील भुलभुलैय्याला आहारी पडुन हा सर्व प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने या मुलांवर लक्ष देऊन त्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

तर आपले पाल्य अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टींच्या मागे धावतय का ? याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून मुले चांगले शिक्षण मिळते म्हणून बारामती सारख्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी पाठवल्यानंतर पालकही निर्धास्त असतात. पण अशी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी किंवा बाहेरगावी मुले शिक्षणासाठी पाठवावेत की नाही असा प्रश्न पालकांना पडू लागला आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच संबंधितावर आवर घालून गरजेचे आहे.

संबंधित प्रकरणात खून झाल्यानंतर काही बनावट खात्यावरून मेसेज पडत होते. त्याचा शोध घेऊन ते बंद करण्याचे काम सुरू आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची जे काम करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
– प्रदिप भिताडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक, बारामती पोलिस ठाणे.

अजितदादांना पत्र …
करमाळा येथील मुलाचा बारामती येथे खून झाला अतिशय गंभीर बाब आहे. संबंधित मुलांनी ठरवून भ्याड हल्ला केला हे निंदनीय आहे. तर त्यानंतर संबंधित मुलांच्या समर्थनार्थ सोशल मीडियामध्ये जे मेसेजेस वायरल होत आहेत ही बाब न पटणारी आहे. अशा लोकांवर योग्य ती कारवाई करावी व त्यांना कायद्याचा धाक दाखवून द्यावा अशी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
– अभिषेक आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रेस सोलापूर.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE