करमाळासोलापूर जिल्हा

जिंती येथे विविध स्पर्धा व उपक्रमात उत्साहात शिवजयंती साजरी

करमाळा समाचार – दिलिप दंगाणे

 

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त जिंती गावात साध्या पद्धतीने विद्यमान जिल्हा परिषदसदस्या सौ सविता देवी राजे भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जिंती गावचे युवा सरपंच संग्राम राजे भोसले, धर्मराज भोसले, गणेश घोरपडे, छगन भोसले, विनायक भोसले, राजू भोसले, गंगाराम वाघमोडे (सर ), वाल्मीक वाघमोडे, इक्बाल मुलाणी, सागर भोसले , प्रताप भोसले, शकील मुलाणी, आयबु मुलाणी, संजय भोसले, अर्जुन वारगड, शिवभक्त कुमार राऊत, हरिचंद्र वारगड महावीर गोरे गुरूजी इत्यादी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा तसेच संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक सायली तात्यासाहेब गिरंजे इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक साक्षी नागनाथ वारगड इयत्ता आठवी, तृतीय क्रमांक कुमारी शवेताली संजय शिर्के इयत्ता आठवी.

प्रथम क्रमांकास छावा कादंबरी, द्वितीय क्रमांकास शिवचरित्र तर त्रितीय क्रमांकास त्रिमान योगी कादंबरी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संगीत खुर्ची व इतर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा पॅड व कंपास साहित्य वाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रम शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला दुपारी स्नेहभोजनाचा आनंद बच्चे कंपनी आणि गावकर्यांनी घेतला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE