तब्बल ११ वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या भाईं स्व. गणपतराव देशमुख स्मृतीदिनानिमित्त विशेष लेख
करमाळा समाचार – विशेष लेख संजय साखरे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तब्बल ११ वेळा प्रतिनिधित्व करणारे शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली……..

आपल्या वयाच्या ९५ वर्षातील ७० वर्ष त्यांनी राजकारणात घालवली. पण त्याचा वेश कधी बदलला नाही. इमान बदलले नाही. पक्ष बदलला नाही व निष्ठा बदलली नाही. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीत गणपतरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सारख्या दुष्काळी भागाचे त्यांनी तब्बल ११ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. उपसा सिंचन योजना मार्गी लावून सांगोल्याच्या दुष्काळी भागाचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या विरोधकांना गणपतराव स्वप्नातही दिसायचे, इतका त्यांचा राजकीय दरारा होता.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी १९७८ मध्ये लोकमत मध्ये एक लेख लिहिला होता. शीर्षक होते. ‘पत्नीला पाचशे रुपयात घर चालवायला सांगणारा मंत्री’ दोघांच्या फोटोसह लेख छापून आला. काही महिन्यांनी गणपतरावा बरोबर सांगोल्याच्या सूतगिरणीच्या कार्यक्रमाला भावे गेले होते.

*पठारावर चढाई करण्यासाठी गेल्यानंतर उमरड येथील एका युवकाचा मृत्यु ; बारामती येथील विद्यार्थी गेले होते ट्रेकिंगला*
कार्यक्रम आटोपल्यानंतर गणपतरावांच्या घरी जेवायला गेले. ज्वारीची भाकरी, झुणका, भरीत, ठेचा वहिनींनी छान बेत केला होता. गणपतरावांनी ओळख करून दिली,——- ‘रतनबाई आपल्यावर लेख लिहिणारे हेच ते पत्रकार—–‘ वहीनीसाहेब ताडकन उठल्या, “खोटं का लिहिता हो—‘ मी म्हटलं काय खोटं लिहिलं, गणपतरावांनी सांगितले ते लिहिलं,’ गणपतरावांकडे फणकार्याने बघून त्या म्हणाल्या; कधी ५०० रुपये पाठवले हो—– ४०० रुपये पाठवायचे—–‘ असे हे गणपतराव होते.
*प्रेमात पळुन आलेल्या मुलीवर वेड्यासारखे फिरण्याची वेळ ; करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरुप घरी*
आयुष्यभर एकाच पक्षाशी त्यांनी निष्ठा राखली. म्हणून पुरोगामी महाराष्ट्रातील उद्धवराव पाटील, एन .डी पाटील, केशवराव धोंडगे, बापू लाड, दि. बा पाटील, दत्ता पाटील, दादा जाधवराव, जांबुवंतराव धोटे यांच्या पंक्तीत गणपतराव आहेत.
*वाळुचोरीसह विविध तालुक्यात ११ गुन्हे दाखल असलेल्या माढ्याच्या एकाला बार्शीत अटक ; करमाळा पोलिसांची कारवाई*
https://karmalasamachar.com/one-of-madhya-who-has-11-cases-filed-in-various-talukas-including-sand-theft-arrested-in-barshi-karmala-police-action/