करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 4 कोटी 20 लाख निधी मंजूर झाला आहे .यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरांमध्ये हेलपाटे घालण्याची आता आवश्यकता राहणार नाही.
प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालय असते परंतु तलाठी कार्यालय तालुक्यांमध्ये जवळपास नाहीतच .जी आहेत ती मोडकळीला आलेली आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या आश्रयाने उभी आहेत ही अडचण लक्षात घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 28 बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर केला आहे. संबंधित कामासाठी तलाठी संघटनेने पाठपुरावा केला होता सदर मागणी पुर्ण झाल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे यांनी समाधान व्यक्त केले आहे .

या गावात होणार मंडळ अधिकारी कार्यालय-
करमाळा, जेऊर, केम ,सालसे, अर्जुननगर ,कोर्टी, केतुर व उमरड .

या गावात होणार तलाठी कार्यालय – देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी ,कंदर ,घोटी, पांगरे, आवाटी साडे कोळगाव करंजे रावगाव वीट जिंती हिंगणी कात्रज , चिखलठाण ,वाशिंबे व शेटफळ.

– दुर्लक्षित विषयांकडे आ. संजयमामा शिंदे यांचे बारीक लक्ष
रस्ते,पाणी, वीज या समस्यांबरोबरच दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार संजयमामा शिंदे यांनी बारीक लक्ष दिले असून करमाळा तालुक्यात गेल्या 4 वर्षात नवीन बांधकामासाठी जवळपास 100 कोटी पेक्षा अधिक निधी त्यांनी आणलेला आहे. यामध्ये डिकसळ पूल – 55 कोटी, नगरपरिषद नवीन इमारत , सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे बांधकाम -10 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा श्रेणीवर्धन करून 100 खाट रूपांतर -25 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी – 18 कोटी, सहाय्यक निबंधक कार्यालय बांधकामासाठी -1 कोटी 69 लाख, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी -4 कोटी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE