भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर याची 108 वी जयंती करमाळा येथे साजरी
प्रतिनिधी सुनिल भोसले
भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा तालुका व शहराच्या वतीने दि. 12/12/2020 रोजी सुर्यपुत्र: भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांची 108 वी जयंती असल्याने त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार विनम्र अभिवादन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन त्यांच्या जीवनावर आधारित प्रशांत कांबळे, सावताहरी कांबळे, शोभाताई कांबळे मॅडम, एल.यु.कांबळे सर. यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास एस.पी.कांबळे साहेब,पुष्पाताई कांबळे, शांताबाई कांबळे, धाकतोडे मॅडम,शाहीर: बनशी दादा कांबळे , महाराजा कांबळे, दशरथ (देवा)कांबळे ,अप्पा टेलर कांबळे, दिपक कांबळे, कविता कांबळे, भाऊनाना कांबळे, बेबी रणबागुल, राणी कांबळे, सोनु अभंगराव तसेच सर्व उपासक व उपासिका पदाधिकारीं या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते . शेवटी नमो बुध्दाय जयभीम, जय संविधान , सरणंतय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
