“बिरोबा बन”आरेवाडीला करमाळा तालूक्यातील बहुजन समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे
दसरा मेळाव्यासाठी “बिरोबा बन”आरेवाडीला करमाळा तालूक्यातील बहुजन समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे—-नितीन तरंगे
बहुजन समाजाचे आराध्य दैवत बिरोबा बन आरेवाडी, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली येथील “दसरा मेळावा” गेली 2 वर्ष “कोरोना”मुळे आयोजित केला नव्हता. मात्र या वर्षी राज्य सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले असून “आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान” येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवविले असून महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी बहुजन समाज बांधव प्रचंड प्रमाणात येत्या 2 ऑक्टोबर ला उपस्थित राहणार आहेत.

स्वतः आमदार गोपीचंद पडळकर साहेब या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तरी कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता एक समाज मेळावा म्हणून किंवा बहुजन समाजाचे अस्तीत्व दाखविण्या साठी तरी तालुक्यातील तमाम बहुजन समाज बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की, आपल्या समाजाचे आराध्य दैवत असल्यामुळे आणि समाजाची वज्रमुठ दाखविण्यासाठी 2 ऑक्टोबर ला दु.१ वाजता बिरोबा बन,आरेवाडीला कसे पोहचता येईल. अशा बेताने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.