भाजपाचे पदाधिकारी कामाला पण राष्ट्रवादीत मुलाखती होऊन नवीन निवडी रखडल्या ; नवीन जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
करमाळा समाचार
एकीकडे भाजपा सत्तेत नसताना जिल्हाभरात मोठमोठ्या कार्यकारणीची घोषणा पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घेतले जाणारे कार्यक्रम, मेळावे घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण सहा महिणे उलटले तरी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची युवक आघाडीची अद्याप निवडी न झाल्याने कार्यकर्त्यात व इच्छुकात नाराजी व्यक्त होत आहे. काहींनी तर नुतन जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांना जिल्ह्याचा भार पेलवत नसल्याचेही बोलले आहे.

जिल्हाभर दौरे करुन युवकांचे संघटन मजबुत केलेले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांना गेल्या सहा महिन्यापुर्वी हटवून पंढरपूर(भोसे)चे दिवंगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कै.राजुबापु पाटील यांचे सुपुत्र अँड.गणेश पाटील यांना संधी देऊन राजुबापुच्या निष्ठेला प्रमाण मानुन हि संधी पक्षाने दिली. परंतु जिल्हा कार्यकारणी संदर्भात ८ आँक्टोबर २०२० रोजी भोसे या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक मा.शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेण्यात आले होते.

या मुलाखतीला तब्बल ५ महिने उलटले आहेत. हा जिल्हा राष्ट्रवादी चा मजबुत गड पहिल्या पासुन मानला जातो. परंतु असे जिल्हाध्यक्ष निवडले तर युवक हाच पक्षाचा मजबूत पाया समजला जातो त्याचे संघटन पदाधिकारी न नेमणे यातुन संघटना बांधनी होऊ शकत नाही. जर या जिल्हाध्यक्षना जबाबदारी पेलवत नसेल तर त्यांनी हि जबाबदारी सोडावी आणि काम करणाऱ्या कार्यकत्यांला संधी दयावी अशी कार्यकत्यात दबक्या आवाजात चर्चा ऐकण्यास मिळत आहे.