भाजपा करमाळा तर्फे मोफत म्युकर मायकोसीस चाचणी शिबिराचे आयोजन
करमाळा समाचार
कोरोना संसर्ग नंतर म्युकर मयकोसीस रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे करमाळा शहर भारतीय जनता पार्टी आणि वरद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वरद हॉस्पिटल येथे 1 जून 2021 रोजी सकाळी 9.30 ते 5 या वेळेमध्ये मोफत तपासणी शिबिर आयोजन केले असल्याची माहिती भाजपा व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी दिली.

कोरोना संसर्गावर मात करून आलेल्या ज्या रुग्णांना डोळे दुखणे, जळ जळ होणे,तिरळेपणा जाणवणे,डोके जड होणे,दात दुखणे, हिरड्यातून रक्त किंवा पू येणे,नाकात श्वास घ्यायला त्रास होणे,नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची या शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्यात येणार आहे.अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आजार अंगावर न काढता शिबिरामध्ये तपासणी करून घ्यावी असे आवाहन श्री.कटारिया यांनी केले आहे.

या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, तालुका संघटन सरचिटणीस शशिकांत पवार, तालुका सरचिटणीस महादेव फंड,अमरजीत साळुंखे,रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिपक चव्हाण,अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.