करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

दार उघड उद्धवा दार उघड !! ; भाजपाचे मंदीरापुढे घंटानाद आंदोलन

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

महाराष्ट्रासह करमाळा शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा भाविक भक्तांसाठी सुरू करून दर्शनासाठी खुले करावेत या मागणीकरीता महाराष्ट्रातील आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने भारतीय जनता वतीन घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे संघटन सरचिटणीस शशिकांत पवार तालुका सरचिटणीस महादेव (अण्णा)फंड, आदेश कांबळे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, अमरजीत साळुंखे, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर वारकरी संप्रदायातील भाविक भक्तगण बंधू-भगिंनीसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी मयुर देवी,आदित्य शहाणे, संदीप जाधव,इस्त्राईल कुरेशी, उमेश पवार, ब्रिजेश देवी,उमेश बनकर,जैनू सय्यद, सोनू शिंदे,सचिन(आबा)कणसे, रविराज पठाडे, संदेश विभूते आदी उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE