आमदार बच्चू कडुंच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे रक्तदान शिबीर
करमाळा समाचार
प्रहार पक्षाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांचा 5 जुलै 2024 रोजी वाढदिवस बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान करून साजरा करण्यात आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे कोणत्या कंपनीत तयार होत नाही. जेव्हा रुग्णांना रक्ताची गरज भासत असते तेव्हा हेच रक्त कामी येत आणि रुग्णाचा जीव वाचतो. बच्चू भाऊंची ओळख ही रुग्णसेवेमुळ तयार झाली. आतापर्यंत भाऊंनी १८ लाख रुग्णांना मोफत उपचार केले आहे. आणि हीच सेवा बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

आमदार बच्चू भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. हे सलग 6 वर्ष ठरले 5 जुलै 2024 रोजी 50 रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रहारचे युवक उपप्रमुख पप्पू ढवळे, अतुल शिंदे, नाना भोगल, जयसिंग घाडगे, दशरथ घाडगे,अनिल शिंदे,आण्णा ननवरे,विजय पाटील, प्रमोद नगरे, अक्षय घाडगे, रवींद्र ढवळे यांनी परिश्रम घेतले तसेच कमलाई रक्त पिढीला आमंत्रित केले होते.
