वीट मध्ये रक्तदान शिबीर शिबीरात ११२ जणांचे रक्तदान ; माजी आमदारांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा समाचार
सामाजिक कार्यकर्ते श्री बिभिषण आवटे व तालुका पंचायत समितीचे सभापती श्री अतुल भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दराडे कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती श्री शिवाजी बंडगर माजी उपसभापती पंचायत समिती करमाळा श्री दत्ता सरडे व वीट चे उपसरपंच श्री समाधान कांबळे श्री भगवान गिरी डॉ श्रीराम जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम श्री भवानी माता मंदिर परिसर विट येथे आयोजित करण्यात आला त्यात वड पिंपळ चिंच कडुनिंब इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली. दिनांक 5 / 1 / 2O22 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री नारायण आबा पाटील (मा. आमदार) , करमाळा पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे साहेब ,सभापती श्री अतुल पाटील श्री शेखर गाडे (मा. सभापती) , तालुका पंचायत समिती सदस्य श्री दत्ता जाधव, श्री विलास मुळे, लकडे साहेब , यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील, सरपंच श्री उदय ढेरे, उपसरपंच श्री समाधान कांबळे, माजी उपसरपंच श्री अभयसिंहराजे भोसले , सुभाष जाधव (उद्योजक) यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या रक्तदान शिबिरात एकूण 112 रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपसरपंच समाधान कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गाडे ज्योतीराम राऊत ,अरविंद जाधव , डॉ भागवत ढेरे , सचिन गणगे , संजय ढेरे , विश्वनाथ ढेरे ,सुभाष आवटे ,नवनाथ जाधव , श्रीकांत जाधव , आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी श्री रेवणनाथ जाधव , अंकुश जगदाळे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) जिवन आवटे , भाऊ गाडे , विशाल गाडे , अनिल ढेरे , आनिल चोपडे , मनोज ढेरे (सामाजिक कार्यकर्ते), बिभिषण ढेरे , हनुमंत ढेरे , तात्यासाहेब जाधव (मा. उपसरपंच) , मेहबूब शेख , सुनिल ढेरे ,अशोक चोपडे , दिगंबर चोपडे , हनुमंत आवटे ,शिवाजी आवटे , नागनाथ जाधव , राजू शिंदे (देवळाली) सुनील ढेरे , (देवळाली ) हरी आवटे ,रविंद्र आवटे , भाऊ पुजारी , काका काकडे , किरण आवटे , रवींद्र ढेरे (मा. उपसरपंच) , तेजश ढेरे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी वृंद शिक्षकवृंद व ग्रामस्थ प्रमुख्याने उपस्थित होते ! रक्तदानासाठी रक्त पेटी म्हणून सिद्धेश्वर रक्तपेढी सोलापुर यांच्या सर्व टीम ने सहकार्य केले . रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यांला स्वर्गीय कांतीलाल आवटे सर सेवा सेवाभावी संस्था व दादाश्री फाउंडेशन वीट यांच्याकडून हेल्मेट व मास्क मोफत देण्यात आले.