दिव्यांगाकडुन चिमुरडीवर अत्याचार ; करमाळा तालुक्यात संतापजनक घटना
करमाळा समाचार
एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केलेले प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील एका गावात चिमूरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे सदरची व्यक्ती तीस वर्षाची असून दिव्यांग आहे ज्या दिव्यांगांकडे आपण सहानुभूतीने पाहतो तेच जर असे कृत्य करू लागले तर त्यांना कोणतीही शिक्षा कमी असेल शासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे
ज्या चिमुरडीला अजून आई-वडिलांच्या प्रेमाच्या स्पर्शाशिवाय दुसरा स्पर्श माहित नाही. या जगात जन्म घेऊन इतके वाईट लोक तिथे असतील याची कल्पना नाही. प्रत्येकावर विश्वास ठेऊन ती जवळ जाते तीला माहीतही नाही असा प्रकार काय असतो. अजुन तर तीने नीट जग बघायचे शाळेतही जायला सुरुवात केली नाही. जर येवढ्या लहान चिमुरडी सोबत करण्यापर्यत या नराधमांची मजल गेली असेल तर अशा लोकांना फाशी शिवाय पर्याय नाही.
तालुक्यातील गावात (आवर्जुन नाव लपवले आहे कृपया चौकशी करु नये) असेच गोष्ट समोर आले आहे. एका चिमुरडीला गावातीलच तरुणांनी ओळखीचा व जवळचा असल्याने त्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. सदरचा प्रकार आईला लक्षात आला तपास केला असता संबंधित नराधम लक्षात आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
संबंधित गावात घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने भेट दिली. यावेळी यातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.