करमाळ्यात संघटना बांधणी करा – शिवसेना नेते वरून सरदेसाई
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील येणारे सर्व निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेची संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी काम करणे गरजेचे असून त्यासाठी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विकासाची कामे तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन शिवसेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी केले.

शिवसेना भवन येथे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी देसाई यांची भेट घेऊन करमाळा शिवसेनेचा आढावा मांडला. यावेळी चिवटे यांनी सांगितले की, करमाळा युवा सेनेचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या पाठीशी आपली अशीच भक्कम साथ राहिल्यास युवा सेनेचे पदाधिकारी आणखी जोमाने कार्य करतील. या प्रसंगी देसाई यांनी करमाळा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू असा ठाम विश्वास चिवटे यांना दिला.

येणाऱ्या काळातील निवडणुका धनुष्यबाण चिन्हावर लढविल्या गेले पाहिजे त्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहनही देसाई यांनी केले. तसेच शिव संपर्क मोहीम अभियान घराघरापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे देसाई यांनी सांगितले