सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत करमाळ्याचे नाव आघाडीवर ; कामाच्या मोबदल्यात निवडीवर शिक्कामोर्तब

करमाळा समाचार 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नविन जिल्हाध्यक्ष निवडीच्या मुलाखती काल सोलापूर येथे पार पडल्या असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसला येत्या 15 दिवसात नविन जिल्हाध्यक्ष भेटणार आहे.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.महेबुब शेख. कार्याध्यक्ष मा.रविकांत वरपे व निरीक्षक मा.शरदजी लाड यांचे प्रमुख उपस्थितीत नविन जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या मुलाखती काल घेतल्या गेल्या, या निवड प्रक्रियेत करमाळा व पंढरपूर तालुक्यात काटे की टक्कर बघायला मिळणार आहे.

पंढरपूर तालुक्यातून जिल्हाध्यक्ष पदासाठी कै.राजुबापू पाटील यांचे चिरंजीव मा.गणेश पाटील, अरुण आसबे, श्रीकांत शिंदे यांनी दावेदारी दाखल केलेली आहे. तर दुसरीकडे करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष व करमाळा तालुक्यात लोकप्रिय असलेल्या अभिषेक आव्हाड या सामान्य कार्यकर्त्याने दावेदारी दाखल करत नविन जिल्हाध्यक्ष निवडीत चांगलाच रंग भरलेला आहे.

पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागील आठवड्यात भोसे येथे पाटील कुटुंबाची भेट घेत पक्ष आपल्याला योग्य ती ताकद लवकरच देईल असा शब्द दिला होता. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा.राजन पाटील यांचे मान्यतेने भोसे गावचे उपसरपंच मा.गणेश पाटील यांनी आपली दावेदारी दाखल केलेली होती. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मा.गणेश पाटील यांना पक्षाकडून झुकत माप मिळण्याची शक्यता आहे. मा.गणेश पाटील यांचेबरोबरच गतवेळचे इच्छुक मा.अरुण आसबे व श्रीकांत शिंदे आणि संदीप मांडवे यांनीही दावेदारी दाखल केलेली आहे.

तर दुसरीकडे घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावरती पुढे आलेले करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.अभिषेक आव्हाड यांनीही या निवड प्रक्रियेत आपली दावेदारी दाखल करत पक्षाकडे केलेल्या कार्याची पावती मागितली आहे. अभिषेक आव्हाड यांनी देखील मागच्या आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भेट घेत त्यांचा कार्य अहवाल सादर केला होता
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निवडीतील आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांना कायमच झुकत माप मिळालेलं आहे व यावेळीही तीच परंपरा गणेश पाटील यांच्या रुपाने पुढे चालू ठेवनार का अभिषेक आव्हाड यांच्या रूपाने सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला संधी देणार हे पाहावे लागणार आहे. याआधीच्या निवड प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांना झुकत माप मिळत गेले परंतु इतिहास पाहता त्यांच्याकडून पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष योगदान मिळालेले नाही हेही तितकेच सत्य आहे.

सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या असता युवक वर्गातून अभिषेक आव्हाड या तरुणाला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.पक्षाच्या कठीण काळात अभिषेक आव्हाड, अरुण आसबे, श्रीकांत शिंदे या तरुणांनी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काम करत सामान्यांच्या हक्कांसाठी वारंवार आंदोलने उभारुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे प्रसंगी त्यांना जेलचीही हवा खावी लागली आहे या गोष्टीचा पक्ष विचार करणार का हाही मोठा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे.तर दुसरीकडे गणेश पाटील यांनी भोसे गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी योग्यपणे सांभाळत ग्रामपंचायतीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्यामुळे सध्यातरी मा. अभिषेक आव्हाड, मा.गणेश पाटील, मा. अरुण आसबे या तीन्ही तरुण नेत्यांमध्ये या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.शेवटी पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय होणार आहे परंतु सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी मागणी जिल्ह्यातील बहुतांश कार्यकर्त्यांची आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE