करमाळाक्राईम

करमाळ्यात सोमवारी भरदिवसा पाच ठिकाणी घरफोड्या

प्रतिनिधी सुनिल भोसले

तालुक्यात सोमवार ता.7 रोजी भर दुपारी पाच ठिकाणी घरफोडी करण्यात आल्या भर दिवसा घरफोडीचे प्रकार घडल्याने करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  वीट ,विहाळ, भोसे येथे हे घरफोडीचा प्रकार घडले आहेत. या तिन्ही गावात सोमवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ह्या घरफोड्या झाल्या आहेत. घरफोडी झालेले तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले असता फिर्याद देण्यासाठी संबंधितांना आज बोलवण्यात आले आहे.

तर घरफोडीचा तपास तात्काळ व्हा अशी मागणी संतोष दिनकर ढेरे यांनी केली आहे. वीट येथिल भैरवनाथनगर मधील प्रकाश दिनकर ढेरे , संतोष दिनकर ढेरे या दोन्ही भावाची घरे फोडली आहेत. येथे घर फोडून लहान मुलांची कंबरेची चांदीची चेन व कानातील सोन्याचे कुडके चोरी गेली आहेत. तर विहाळ येथील बाळासाहेब काशीनाथ बंडगर यांचे गावातील घर दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कुलूप तोडून घरातील चोरी करत असताना कशाचा आवाज येत आहे, म्हणून शेजारील एका महिलेने पाहिले असता पल्सर गाडीवर दोन तरुण तोंडाला काळे बांधलेले घरात दिसून आले. यावेळी या महिलेने संबंधितांना विचारले असता आम्ही पाहुणे आहोत असे म्हणून पल्सर मोटारसायकल वर बसून पळ काढला . तर भोसे येथील सुरवसे वस्तीवरील बापू यशवंत सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दारवाजा तोडुन १५ हजार रुपये व ५ ग्रॅम सोने व चांदीचे पैंजण चोरी केले आहे. तर गावातील सुदाम यादव सूरवसे यांच्या घराचे कुलूप व दार तोडले कपाट फोडले व घरातील दागिणे चोरी गेले आहेत.

तालुक्यातील भर दिवासा घर फोडलेल्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी याचा तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थांनकडुन केली जात आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE