भंगार गोळा करणाऱ्या दांपत्याच्या घरी चोरी ; सोन्यासह रोख रक्कम घेऊन पसार
करमाळा समाचार
हणुमंत शिंदे हे भंगार गोऴा करुन उपजिविका करतात दि 16 रोजी रात्रौ 09/00 वाजती कुटुंबासह जेवण केले. रात्रौ लाईट नसल्याने जास्त उकाडा असल्यामुळे घराचे दार उघडे ठेवुन सर्वजण समोर झोपले होते. याची फिर्याद सारिका शिंदे रा. देवळाली यांनी दिली आहे.

मध्यरात्री दि 17 रोजी 02/30 वाजता रात्री अचानक झोपेतुन उठल्यावर घरात जावुन पाहिले असता घरातील स्टीलचा डबा. इतर सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसले म्हणुन घरात पाहिले असता स्टीलचे डब्यात ठेवलेले दीड तोळ्याचे गंठण व त्यात ठेवलेली रोख रक्कम व मोबाईल चोरीस गेल्याची खात्री झाली.
चोरीस माल गेला त्यांचे वर्णन पुढीलप्राणे 1)40000/- एक गऴ्यातील दीड तोळ्याचे गंठण सोन्याचे जुने वापरते किमंत अंदाजे
2) 20000/- त्यात रोख रक्कम 200-,500 रु दराच्या नोटा वापरत्या
3) 2000/- एक रेडमी 7 नोट या वर्णानाचा व किमंतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करून फिर्यादीचे संमती शिवाय मुद्दाम लबाडीने वरील वर्णानाचा व किमंतीचा माल चोरुन नेला आहे. म्हणुन अज्ञात चोरट्या विरूद्ध तक्रार केली आहे.
