करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सिझेरियन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट होणार

करमाळा समाचार 

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया चालू असून आजपर्यंत 141 गरोदर महिलांच्या मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आवश्यक असणाऱ्या खाजगी भूलरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ या डॉक्टरांच्या मानधनास शासन प्रक्रियेतून विलंब होत होता.

तालुक्यातील गरीब व गरजू रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आरोग्य मंत्री मा. ना. राजेश टोपे यांनी संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE