शेलगाव येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा समाचार
जागतिक कर्करोग दिनानिमित्त ग्रामपंचायत शेलगाव ( क ) यांच्यावतीने आज व्यसनमुक्तिपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ. सोनवणे तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण राख यांनी विशेष मार्गदर्शन केले .
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला कशाप्रकारे हानी पोहोचते याची माहिती त्यांनी दिल्यानंतर व तंबाखू सोडण्याचे फायदे उपस्थित ग्रामस्थांना सांगितल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी तंबाखूसेवन करणारे काही ग्रामस्थांनी तात्काळ व्यसनमुक्त होण्याचा निर्णय घेतला .
या कार्यक्रमामध्ये रामचंद्र तुकाराम काटुळे,आत्माराम गणपत वीर, अशोक मधुसूदन काटुळे, सुभाष झुंबर पायघन,गणेश पांडुरंग जाधव, नारायण विश्वनाथ शिंदे ,अप्पा मल्हारी जगताप यांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प केला. यानिमित्ताने त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी श्री अशोक का टुळे, सतीश हरिहर, डॉ. विकास वीर या ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक महेश काळे यांनी मानले.