सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ; बापाच्या कपाळावर लावली रिव्हाल्वर
करमाळा समाचार
कोर्टात दावा दाखला असताना उस का तोडतो असे विचारण्यास गेल्या असता मारहाण करून रिवाल्व्हर कपाळाला लावून तुला जीव मारतो अशी धमकी दिली. शिवाय परत शेतात यायचे नाही असे म्हणत धमकी दिली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलासही मारहाण केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार केत्तुर क्रमांक २ ता. करमाळा दि १८ रोजी दुपारी १ वाजण्याचा सुमारास घडला आहे.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मालोजी खाटमोडे, देविदास कोकणे, तानाजी पाठक सर्व रा. केतुर ता. करमाळा, दादासाहेब रणदिवे रा. उंदरगाव ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर माधवराव तुळशीराम खाटमोडे (वय ८५) केतुर क्रमांक २ यांनी तक्रार दिली आहे.

माधवराव खाटमोडे यांचा सेवानिवृत्त असलेल्या थोरल्या मुलासोबत शेतीच्या वाटपावरून वाद आहे. या प्रकरणी कोर्टात दोन दावे चालू आहेत. १८ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माधवराव खाटमोडे हे व मुलगा लखोजी असे दोघे केतुर क्रमांक १ येथील शेतात गेले असता त्यावेळी थोरला मुलगा मालोजी खाटमोडे हा कोर्टात दावा असलेल्या शेतात कारखान्याचे हार्वेस्टर मशीन आणून ऊस तोडण्याचे काम चालू होते. त्यावेळी सामायिक शेती असून, अजून वाटप झाले नाही. या शेती संदर्भात कोर्टात दावा चालू असताना तू उस का तोडतो ? असे म्हणले असतात मालोजीने वडिलांनाच उचलून आपटले व नंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली किंवा स्वतःजवळ असलेले रिवालव्हर काढून कपाळाला लावले व जीव मारतो म्हणून धमकी दिली.
यावेळी डाव्या हाताने रिव्हालव्हर बाजुला ढकलला त्यावेळी माधवराव यांच्या जुन्या जखमेवर पुन्हा जखम होऊन नख उचकटला. यावेळी शिवीगाळ सुरू असताना धाकटा मुलगा लखोजी सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली. यावेळी मालोजी यांच्या शेतात काम करणारे देविदास कोकणे, तानाजी पाठक व दादासाहेब रणदिवे यांनी लखोजी खाटमोडे ला पकडले होते. यानंतर ऊस तोडणीसाठी आलेल्या हार्वेस्टरच्या कामगारांनी सदर भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.