करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा समाचार इफेक्ट – बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनानाला आली जाग ; शिक्षकांनाही दिली जाणार लस

करमाळा समाचार 

कोविडच्या सर्वे व इतर कामासाठी शिक्षकांना लावले जाते. पण लस मात्र दिली जात नाही. याप्रकरणी करमाळा समाचार बाजू मांडल्यानंतर आता संबंधित विभागाचे अधिकारी जागे झाले आहेत. तर त्यांनी आता शिक्षकांनाही लस देण्यास संबंधित सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता नगरपरिषदसह ग्रामीण भागातली शिक्षकांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लस दिली जाणार आहे.

कोरोना महामारीमध्ये विविध प्रकारचे सर्वे असो किंवा जनजागृतीची कामे असो अशा प्रकारच्या कामांसाठी शिक्षकांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. त्यांच्यासह आरोग्य विभाग तसेच महसूल कर्मचारी ही काम करत होते. पण ज्यावेळी लस देण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र फक्त आरोग्य विभाग व महसूलच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. परंतु शिक्षकांना विचारात घेण्यात आले नव्हते.

याबाबत करमाळा समाचारच्या वतीने आवाज उठवण्यात आला. त्यानंतर मात्र प्रशासन खडबडुन जागे झाले व शिक्षकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापुर्वी आरोग्य कर्मचारी तसेच महसुल व पोलिसांना लस दिली पण शिक्षकांना कसल्याच सुविधा पुरवल्या नव्हत्या. काम केले नाही तर शिक्षकांच्या विरोधात कारवाईचे आदेश काढले होते. पण तरीही शिक्षक काहीच बोलत नव्हते. पण समाचारने आवाज उठवल्यावर प्रशासन जागे झाले आहे.

शिक्षकांची पगार अनेकांना खुपते …
लोकडॉऊन काळात शाळा बंद असतानाही शिक्षकांना पगारी सुरू होत्या. तर कायमच शिक्षकांना पगारी वरून बोलले जाते. पण त्यांचे कार्य मात्र पाहिले जात नाही. लहान मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दुर्लक्षित ठेवले जाते. शिवाय त्यांच्या कडुन वेळोवेळी वेगवेगळे सर्वे व कामे करुन घेतली जातात ते कधीच काहीच बोलत नाहीत. पण त्यामोबदल्यात त्यांना सुविधा मात्र मिळत नाहीत. तर लॉकडाऊन काळात मोफत पगार घेण्यासाठी टोमणेही खावे लागले पण अशा परिस्थितीत शाळा बंद असतानाही शिक्षक मात्र गप्प नव्हते दिले ते काम करतच होते. कोणतेही प्रशिक्षण नसताना कोरोना काळात बाहेर फिरत होते. हे मात्र दुर्लक्षित राहते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE