E-Paperसोलापूर जिल्हा

Whats app किंवा facebook वापरत असाल तर सावधान ; होऊ शकते आर्थीक नुकसान

करमाळा समाचार 

आर्थिक फसवणूक करण्याचे वेगवेगळे फंडे आज-काल आजमावले जात आहे. त्यातच आता नवीन फंडा समोर येत आहे. व्हाट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून आपल्या सोबत अश्लील भाषा व असली व्हिडिओद्वारे संभाषण केले जात आहे.

तशीच अपेक्षा आपल्याकडून ही केली जात आहे. जेव्हा कोणी त्याच भाषेत आपलेही अश्लील व्हिडिओ अपलोड करेल किंवा अश्लील व्हिडिओ कॉल करेल त्यावेळी ते व्हिडिओ ते जपून ठेवले जातील व पुन्हा ते आपणास ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात.

politics

यासाठी नवीन आलेल्या व्हिडिओ कॉल तसेच नवीन नंबर वर चॅट करण्यापूर्वी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात करमाळ्यातील पत्रकार विशाल घोलप यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे इतरांनाही जागृत करण्याचा प्रयत्न केला असून यापूर्वी एका व्यक्ती सोबत अशी घटना घडली. याबाबत त्यांनी उल्लेख केला आहे. तरी इथून पुढे दुसरा कोणी याचा बळी होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE