सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम साजरा ; महसुल सप्ताह निमित्ताने सालसे येथे कार्यक्रम
करमाळा समाचार
1 ऑगस्ट पासून राज्यभरात सुरू असलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत सालसे मंडळातील मौजे साडे व सालसे येथील शहीद जवान यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली. तसेच शहीद जवान यांच्या कुटुंबातील वारसांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या वारसांना मोफत 7/12 वाटप करण्यात आले.

सोबत उपविभागीय अधिकारी करमाळा श्री.समाधान घुटुकडे साहेब, करमाळ्याचे तहसीलदार विजयकुमार जाधवसाहेब, सालसे मंडळ अधिकारी अमितकुमार कलेटवाड, सालसे व साडे तलाठी महालिंग बिराजदार, नेरले तलाठी परमेश्वर सलगर, अव्वल कारकून सादिक काझी तसेच इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते…
