करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भाजपाचे नेते अमित शहांच्या व्यासपीठावर रश्मी बागल उपस्थित ; भाजपा प्रवेशाच्या रंगल्या चर्चा

करमाळा समाचार

आज भाजप व मित्र पक्षांच्या सोबत अमित शहा हे पुणे येथे उपस्थित आहेत. यावेळी करमाळ्याच्या बागल गटाचे नेत्या रश्मी बागल यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीच बऱ्याच वेळा बागल यांनी भाजपच्या नेत्यांची जवळीक साधताना दिसून आल्या. परंतु थेट ते कोणत्या पक्षात आहेत हे अद्याप जाहीर केलेले नसले तरी आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यानी पहिले पाऊल ठेवले असावे असे दिसत आहे. पण याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली असता कारखाने व साखरे संबंधि विषयी चर्चा करण्यासाठी आपण गेल्याचे सांगितले आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय नोंदणी विभागाच्या ‘सहकार से समृद्धी या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री Amit Shah यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल तिथे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी शिंदे गटाचे नेते तसेच भाजपाचे बरेचशे नेते बागल गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बागल आता सत्ताधारी गटासोबत आहेत. एवढे निश्चित झाले होते. परंतु नेमके ते कोणत्या गटासोबत आहेत. अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास नक्कीच कारखान्याला अच्छे दिन येतील का ? . त्यामुळे त्यांची नेमकी पुढील भूमिका काय राहते याकडे लक्ष लागून राहील.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE