करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आयुर्वेदोक्त आजीबाईचा बटवा काळाची गरज – जिंती आयुष शिबिरामध्ये सीईओ मनीषा आव्हाळे यांचे आवाहन

करमाळा समाचार


काही गोष्टी आपणास परंपरेने मिळतात मात्र त्या आपण विसरून जातो. आयुष्य जगत असताना आपणास जेव्हा अडचणी अथवा आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात तेव्हाच आयुर्वेदाचे महत्त्व याची आपणास जाणीव होते असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

करमाळा तालुक्यातील जिंती येथे आयोजित आयुष शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वरवटकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत , तालुका आरोग्य अधिकारी डाॅ कोमल शिर्के, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मनीषा आव्हाळे म्हणाल्या माझा आयुर्वेद बाबत चांगला अनुभव असून मला आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे. आयुर्वेदात पथ्य पाणी खूप पाळावे लागतात व ते पाळणे गरजेचे असते. प्रत्येकाने किमान एक औषधी वनस्पती झाडाची लागवड शेतात किंवा आपल्या अंगणात करावी, जुन्या गोष्टीचे महत्त्व न विसरता आत्मसात करणे, त्याचबरोबर निसर्गापासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा, निसर्ग आपणास भरभरून देणार, त्याचबरोबर आजी बाईचा बटवा हा आपला अमूल्य ठेवा आहे ती काळाची गरज असून आपण तो जोपासला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

आयुष ग्राम जिंती हा भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा उपक्रम आहे. गत तीन वर्षापासून जिंती व पंचक्रोशीतील नागरिकांना रुग्णांना आयुर्वेद व योग चा फायदा होत आहे. स्तनाचा कर्करोग या आजाराचे प्रमाण महिला वर्गांमध्ये जास्त असून महिलांनी या आजारा विषयी कुठलीही शंका अथवा भीती न बाळगता निसंकोचपणे तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन मनीषा आव्हाळे यांनी यावेळी उपस्थित महिला वर्गांसाठी केले. यावेळी आयुषग्राम कॅलेंडरचे व योग पुस्तिकेचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले .

तसेच करमाळा तालुक्यातील 50 अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्याची सेवा पुरवणे कामी नुकतीच मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या फिरते वाहनाची व पथकाची पाहणी मनीषा आव्हाळे यांनी केली .
आयु म्हणजे जीवन, वेद म्हणजे शास्त्र अशी आयुर्वेद या शब्दाची निरुक्ती आहे. उपलब्ध असलेल्या वनौषधी, आहार ,व्यायाम ,योग ,प्राणायाम या माध्यमातून आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. निदान प्रोजेक्ट या महत्त्वकांक्षी योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडामध्ये भरीव निधीची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी अंदाजे 700 रुग्णांनी आयुष शिबिराचा लाभ घेतला. तसेच 11 तालुक्यातील 22 आरोग्य सेविका यांना प्रोजेक्ट निदान अंतर्गत स्तनाचा कर्करोग तपासणी साठीच्या थर्मल स्कॅनिंग मशीनचे प्रशिक्षण स्त्रीरोग तज्ञ मार्फत देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी शासकीय आयुर्वेद दवाखान जिंती चा प्रवास कथन करून अंतरंग उलगडले तर जिंती आयुष ग्रामचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे यांनी आभार प्रदर्शन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE