कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडावे ; राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वारे यांची मागणी
करमाळा समाचार
कुकडी धरणातील पाणी मांगी तलावात सोडुन तलाव भरुन घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

चालू पावसाळी हंगामामध्ये करमाळा तालुका परिसरात अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने मागितला मध्ये पुरेसा पाणी साठा झालेला नाही. कुकडी लाभ क्षेत्रामध्ये कुकडी धरणातील ओव्हर फ्लो पाणी मांगी तलावांमध्ये सोडून तलाव भरून घेण्यात यावा. तलावात पाणी सोडल्यास उन्हाळ्या मध्ये मांगी तलावावरील 18 गावांची पाणी पुरवठा योजना चालू राहील व येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव जिल्हा परिषद सदस्य असून सदरचा मांगी तलाव याच जिल्हा परिषद गटांमध्ये येत असल्यामुळे आपणाकडून या मागणीचा लक्षपूर्वक विचार व्हावा अशीही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. तरी कुकडी धरणातील पाणी मांगीला सोडण्यात यावे याबाबतचे निवेदन सुपूर्त करताना वारे यांच्यासोबत आमदार निलेश लंके दिसत आहे.