करमाळासोलापूर जिल्हा

सोळा समर्थकांसह सवितादेवी राजेभोसले उमेदवारी दाखल करणार ? टोकाची गोपणीयता

करमाळा समाचार

थोड्याच वेळात करमाळा समाचार च्या बातमीवर शिक्का मोर्तब होणार आहे. तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोडी होताना दिसणार आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चालु असलेल्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या समर्थक नेत्या सवितादेवी राजेभोसले यांनी मकाई देवीची दर्शन घेत मैदानात उतरल्याचे दिसत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर त्यांच्यासह तब्बल 16 उमेदवार आहे उभे राहतील अशी दाट शक्यता आहे ऐनवेळी काय बदल होऊ शकतो पण सध्यातरी सोळा उमेदवार असणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता निवडणुकीत मोठी लढत बघायला मिळणार आहे.

बागल गटाची मकाई सहकारी साखर कारखान्यावर मागील स्थापनेपासून एक हाती सत्ता आहे. मागील निवडणुकीत तर संपूर्ण सतरा उमेदवार ही कोणत्याच गटाला मिळाले नव्हते. जो गट मैदानात बागल गटाला विरोध करण्यासाठी उतरला होता त्यांना केवळ आठ जागेवर उमेदवार उभा करता आले होते. परंतु त्या जागाही एकतर्फी विजय मिळवून बागल गटांनी सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत प्राध्यापक झोळ यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत उमेदवारी उभा करण्याचा प्रयत्न केला असला तरी संपूर्ण पॅनल उभा करण्यासाठी उमेदवार मिळतील का नाही चर्चा होती. असे असतानाच अचानक मोहिते समर्थकांनी सर्व पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतलाय पण अजुन जाहीर केला नाही.

आता संपूर्ण पॅनल उभा राहत असल्यानंतर निवडणुकीत प्राध्यापक झोळ सरांचा गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज भरला नसला तरी मोहिते पाटील समर्थक हे तहसील परिसरात जमा झाले आहेत. त्या ठिकाणी एकाच वेळी सर्व उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघ वगळता इतर सोळा मतदारसंघात उमेदवार मिळाल्याची माहिती मिळत आहे. तर ते सर्व उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे.

प्राध्यापक झोळ यांनी उघडपणे आपला विरोध व उमेदवारी जाहीर केली होती व त्यांच्यासोबत विरोधी गटातील बरेचसे छोटे मोठ्या संघटना जोडल्याही होत्या. परंतु मोहिते पाटील समर्थकांनी गोपनीय पद्धतीने सर्व माहिती गोळा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतल्याचा दिसून येत आहे. या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गोपनीयता ठेवण्यात आली आहे. तर अद्यापही त्यांनी उघडपणे सांगणे टाळत आहेत. प्रमुख समर्थक वगळता इतर कार्यकर्त्यांनाही अद्याप सदरची माहिती मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. बैठका व झालेल्या चर्चा या सूत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या ती माहिती आपण जाहीरही केली ती आता खरी होत चालली आहे. त्यामुळे आता लवकरच उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पॅनल मध्ये कोण कोण असणार आहे ते लवकरच जाहीर करण्यात येईल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE