मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच पुढे नेत आहेत!!!
करमाळा (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्ववादाचा विचार पुढे घेऊन राजकारण व समाजकारण करीत असून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील मिळत असलेला पाठिंबा म्हणजे त्यांच्या भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारली आहे असे मत ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती अनिल बोरे यांनी व्यक्त केले.

शिंदे समर्थक शिवसैनिकांचा आढावा घेण्यासाठी ती आज करमाळा दौऱ्यावर आले असता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा येथे त्यांनी भेट देऊ शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, हिवरवाडी चे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, कोळगाव चे शाखाप्रमुख नागेश चेंडगे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, मारुती भोसले, भोसे चे शाखाप्रमुख बाळासाहेब आडसूळ, संजय जगताप, शुभम मोहिते, हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला आपला माणूस मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत असून खऱ्या अर्थाने शिवसैनिकाचा आता स्वाभिमान जागा झाला आहे. करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवणार आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते अनिल बोर यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच तालुक्यातील सर्व शिवसैनिक कामाला लागल्या असून करमाळ्याचा भगवा झेंडा विधानसभेत फडकेल असा विश्वास यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला.