करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तहसिल कार्यालय बाहेर नेण्यास नागरिकांचा विरोध ; सोशल मिडीयातुन रंगल्या चर्चा

करमाळा समाचार 

करमाळा शहरातून तहसील कार्यालयासह इतर कार्यालय हे मौलाली मार्ग परिसरात नेण्यात येणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर समाज माध्यमातून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी समाज माध्यमातून सदरच्या प्रक्रियेला विरोध केला जात आहे. गावातच असलेले कार्यालय सोयीस्कर असून बाहेर नेऊन गये नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याची बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत मोठे आंदोलन उभारले जाऊ शकते. नागरिकांच्या विरोधात त्या भूमिकेमुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

करमाळा तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालय हे एकाच ठिकाणी आहेत. एका इमारतीमध्ये सर्व प्रशासकीय कार्यालय आणण्याच्या हेतूने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला. पण सद्यस्थितीला असलेल्या जुन्या प्रशासकीय परिसरामध्ये अधिकची जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगत प्रशासनाने सदरची बांधकाम हे मौलाली माळ परिसरात करण्याचे ठरवले आहे. पण असे केल्यानंतरही पंचायत समिती, पोलीस ठाणे व दुय्यम निबंधक कार्यालय अशी कार्यालय हे जुन्याच ठिकाणी राहणार असल्याने लोकांना धावपळ करावी लागेल अशी भूमिका समाज माध्यमातून मांडली जात आहे. यामुळे सर्व पक्षीय लढा उभारू असा इशारा यावेळी समाज माध्यमांमध्ये विविध पक्षाच्या वतीने दिला जात आहे.

politics

सध्याच्या तहसील कार्यालय परीसरात मुबलक जागा उपलब्ध आहे. गरज लागली की कसेही नियोजनशुन्य छोटी छोटी कार्यालये (खोल्या) बांधलेल्या आहेत. आहे त्या जागेतच सध्याची रेव्हेन्यूशी संबंधीत सर्व विभाग एकाच मोठ्या इमारती मध्ये बांधणे शक्य आहे. त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना एकाच परिघात सर्व कार्यालयांची कामे करून घेणे अतिशय सुलभ होईल. त्यामुळे गैरसोयीच्या जागेत तहसील कार्यालय नेहण्याच्या प्रस्तावाला विरोध होणे गरजेचे आहे.
– प्रा. अभिमन्यु माने, करमाळा.

करमाळा तालुक्यात सर्वच कार्यालय एका ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना सोयीचे होते. पण नव्या ठिकाणी कार्यालय हलवल्यास अनेकांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे जुने कार्यालय अद्यापही सुस्थितीत आहे. तर जे कार्यालय सोबत जाणार आहेत त्यांचेही नुकतीच डागडुजी किंवा इमारत बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्या ठिकाणी सर्व कार्यालय नेण्याचा अर्थ म्हणजे लोकांची गैरसोय वाढवणे आहे.
– हनुमंत मांढरे, मा.तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE