E-Paperकरमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

सावधान .. Whats app वरुन नवीन जाळे ; करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणुक

समाचार टीम

फसवणुकीचे रोज रोज नवीन प्रकार घडत असताना आपल्याला दिसून येतात. पण सदरची माहिती असताना सुद्धा बरेच लोक यात फसवले जाण्याची शक्यता आजही कायम टिकून असल्याने फसवणूक करणारे लोक रोज असे प्रयत्न करीत राहतात आणि त्यात काही भोळेबाबडी अडाणी लोक यात फसले जातात. त्याचाच एक प्रत्यय करमाळा तालुक्यातील एका गावात घडला आहे. येथील शेतकऱ्याने व्हाट्सअप चा ओटीपी दिल्याने त्याचे व्हाट्सअप हॅक होऊन पुन्हा त्याला स्वतःचेच व्हाट्सअप ओपन होत नाही. त्यामुळे आता त्याने पोलिसात धाव घेतली आहे.

ओटीपी च्या साह्याने बँक खात्यामधील रक्कम जाण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. आपण ते ऐकूनही असाल तसेच एटीएम किंवा ऑनलाइन ट्रांजेक्शन मध्ये अशी फसवणूक बऱ्याचदा बघायला मिळते. पण त्याचं बँकेत खातच नाही बँकेच्या खात्यावर जास्त पैसे नाही अशा लोकांना ओटीपी देण्यासाठी काही अडचण वाटत नाही. पण ते बऱ्याचदा विसरून जातात की सदरचा ओटीपी फक्त बँक अकाउंटलाच नाही तर आपल्या सोशल माध्यमांनाही जोडलेला आहे.

असाच एक प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. बाळेवाडी येथील लक्ष्मण नलवडे या शेतकऱ्याने मोबाईल वापरत असताना त्याच्या मोबाईलवर हिंदी भाषेत बोलणाऱ्या 78 73 59 41 18 या नंबर वरून फोन आला व आपल्या अकाउंट वर पैसे आले आहेत ते चेक करण्यासाठी एक ओटीपी आलेला आहे ते तो सांगावा असे सांगितले. त्यावेळी सदरचा मोबाईल हा नलवडे यांच्या कामगाराकडे होता त्या कामगाराने तो ओटीपी सांगितला.

ओटीपी सांगून बराच वेळ झाला तरीही कसले पैशाचे ट्रांजेक्शन न झाल्याने सदरचा कॉल हा फेक होता असे लक्षात आले. पण बँकेतूनही पैसे न गेल्याने कोणताही त्रास होणार नाही असे समजून नलवडे हे शांत राहिले. पण खरा त्रास तर तेव्हा सुरू झाला होता जेव्हा त्यांच्या कामगारांनी हा ओटीपी सदरच्या व्यक्तीला दिला होता. त्या हिंदी भाषिक व्यक्तीने सदर ओटीपी वरून नलवडे यांचं व्हाट्सअप हॅक केलं होतं. तेव्हा नलवडे यांचं व्हाट्सअप बंद पडून संबंधित व्यक्ती हा व्हाट्सअप वापरू लागला. त्याने एका महिलेशी चॅटिंग केल्यानंतर तिच्या पतीचा फोन हा नलवलेला आल्यानंतर सदर प्रकार उजेडात आला.

आता सध्या तो व्यक्ती नलवडे यांच्या संपर्क नंबर वरून व्हाट्सअप वर इतरांना बोलताना दिसत आहे. व यातून तो पैशाची मागणी ओटीपी ची मागणी व कोणत्याही प्रकारची जाती वाचक कारणामे करू शकतो. त्यामुळे आता नलवडे यांना यातून त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी करमाळा पोलिसात गेले आहेत.

आमच्या कामगाराकडून गैरसमजुकीतून हा क्रमांक गेलेला आहे. तरी माझ्या नंबर वरून येत असलेल्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे. मी कोणाला कसलेही पैसे मागितले नाही किंवा माझ्या मोबाईल वरून चुकीचा काही मेसेज आल्यास तो संबंधित पोलीस ठाण्यात किंवा करमाळा येथील पोलीस ठाण्यात कळवावा
किंवा मोबाईलवर थेट कॉल करू शकता सदरचा नंबर माझ्याकडे आजही सुरू असून फक्त व्हाट्सअप चा नंबर हा त्या हॅकर कडे आहे. त्यामुळे त्याच्या व्हाट्सअप मेसेज ला सावध राहा.
लक्ष्मण नलवडे, बाळेवाडी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE