नगरपरिषदेचा तहान लागल्यावर विहिर खांदण्याचा प्रकार ; नागरिकांचा संताप
करमाळा समाचार
करमाळा शहरातील पाणीपुरवठ्याचा मोठ्या प्रमाणावर बोजवारा उडाला असून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर अडचण भासत आहे. दुकान व घरांमध्ये आता घरात व दुकानांमध्ये जारचे पाणी आणावे लागत आहे. तर लहान मुले ही आता शाळेत जाताना विकतची बाटली घेऊन शाळेत जाऊ लागले आहे. अत्यंत खराब परिस्थिती सध्या पाण्याची झाली असून यावर नगरपालिका प्रशासनाने कसल्याही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही.

मुळातच नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण झाल्यापासून नगरपरिषदे वर प्रशासन काम पाहत आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने मुख्याधिकारी हे रजेवर गेल्यानंतर सदरचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे राहिला आहे. कमी पाऊस झाला आहे. सध्या उजनी ही मायनस ३४ वर आहे. पावसाळ्यात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असताना नगरपरिषदेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. तर प्रशासक म्हणून प्रांत यावर लक्ष देत आहेत.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नगरपालिकेने वेळीच उपायोजना राबवणे गरजेचे होते. परंतु ज्यावेळी तहान लागली त्यावेळी विहीर खाण्याचे काम हे नगरपरिषदेकडून केले जात आहे. आता इथुन पुढे प्रस्ताव पाठवणार याचे काम पुर्ण व्हायला वर्ष जाणार तो पर्यत हीच परिस्थिती राहणार. बऱ्याच दिवसांपासून पाणी मिळत नाही. लोकांना भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी अनाधिकृत लोड शेडिंग लोकांच्या माथी मारली जात आहे. या सर्व नियोजन शून्य कारभारामुळे करमाळ्याची जनता वैतागली आहे.
आधीच पाणी एक दिवसाआड येते. त्यातूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे दोन दिवस त्याच्यावर घरातील कामे व पिण्याचे पाणी टिकवणे कठीण होते. त्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत आणावे लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या मानाने लोकसंख्या वाढत आहे असल्याचे नगरपालिकेला आत्ता लक्षात आलं आहे का ? इतक्या दिवस काय झोपा काढत होते का ?
– गणेश शहाणे,
नागरीक करमाळा.