करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

हीच ती वेळ … सामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्वाला गरज आहे एका संधीची

करमाळा समाचार

आपल्याकडे कायम मानले जाते युवकांनी राजकारणात या. राजकारणात आले पाहिजे तरच समाज बदलेल. पण ज्यावेळी एखादा युवक बदल घालवण्यासाठी मैदानात उतरतो त्यावेळेस मात्र आपण त्याला संधी देण्याऐवजी पाण्यात पाहतो व पुन्हा जुनेच तेच तेच लोक आपल्याला तीच तीच स्वप्न दाखवण्यासाठी पुन्हा आपण निवडून देतो. यामुळे जैसे थे परिस्थिती राहत आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे युवकांना मैदानात उतरल्यानंतर संधी दिली पाहिजे.

दुसरा तिसरा कोणी नसुन तुमच्या गावातील सामान्य घरातील गणेश जगताप आहे. सध्या तो आपल्या गावात सरपंचपदासाठी उभा आहे. कंदरसारख्या ग्रामीण भागात एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा स्वकर्तुत्वाने मंत्रालयापर्यत मजल मारतो. मंत्रालय मुंबई येथे आमदार मोहदय यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असताना गावासह तालुक्यातील अनेकांना मदत केली आहे. कामाच्या निमित्याने आपला गणेश महाराष्ट्र फिरला. अनेक सरकारच्या अनेक योजना नागरिकांना मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे.

सतत गावासाठी काम करत राहणारा व्यक्तिमत्त्व आहे. मुंबईत घेतलेल्या कामाचा , अनुभवाचा फायदा, मंत्रालयातल्या ओळखीचा फायदा आपल्या गावाच्या विकासासाठी होऊ शकतो. सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना आणून हे गाव एक आदर्श अस गाव म्हणून कंदर महाराष्ट्रात ओळखलं जाईल असा प्रामाणिक प्रयत्न करायचे असा त्याचा मानस आहे.

सध्या गावात राष्ट्रीयकृत बँक नाही सर्वसामान्य नागरिकांना गरज आहे. ती गरज ओळखून बँक गावात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच गावातील श्रीराम मंदिर व पुराणकालीन हेमांडपंथी महादेव मंदिर, जोतिबा मंदिर परिसरामध्ये घाट पायऱ्या, सुशोभीकरण, बोटिंग करून गावच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच गावात सुसज्ज वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका तयार करून तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आधिकारी यांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे. तसेच गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे.

ग्रामपंचायत मध्ये एक खिडकी योजना तयार करणार आहे. त्याच्या माध्यामातून सर्वसामान्य नागरिक यांना शासकीय कामासाठी करमाळा ला जाण्याचा व येण्याच्या हेलपाटे वाचवून ग्रामपंचायत मार्फत त्यांचे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासह अन्य कामे व विकासासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

हे सगळे आश्वासन तर प्रत्येक जण देतो पण गणेश असा एक व्यक्ती आहे. जो सामान्य कुटुंबातून स्वबळावर पाहिजे ते मिळवत गेला आहे. आपल्या मुलांना शहरात जाऊन तहसील कार्यालयात रखडलेली कामे पूर्ण होत नाहीत. पण गणेशने थेट मंत्रालय गाठले व त्या ठिकाणाहून गरजवंतांची कामे करू लागला अशा या जिद्दी व धाडसी युवकाला गाववाल्यांनी एक संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे जात पात धर्म व जवळचा लांबचा सगळं सोडून केवळ एक तरुण व विकास करण्यायोग्य समाजसेवक आपल्यासमोर उभा आहे. त्याला संधी देणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. नाहीतरी आपण आपल्या आवडत्या लोकांना निवडून देऊन पुन्हा त्याच त्याच गोष्टी करत राहिलो आहोत आता बदल करण्याची संधी आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE