पाण्याच्या मुद्द्यावरुन नाराज असताना मोठ्या नेत्याची पालकमंत्र्याला क्लिनचिट ; नेमके कारण गुलदस्त्यात

करमाळा समाचार 

पालक मंत्र्यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न पक्षातील मंडळी सह विरोधक करत आहे. याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांना विचारले असता त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामकाजावर समाधानी असल्याचे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण पाटील यांनी अशी भूमिका घेत बॅकफूटवर गेलेत का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवण्याच्या मुद्द्यावरून पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी यांनी विरोध दर्शवला होता. त्याशिवाय विविध आंदोलनाच्या माध्यमातून पालक मंत्री हटावच्या योजनाही आखल्या जात होत्या. त्याच दरम्यान लसीकरणात ही पुण्याला झुकते माप देऊन सोलापूरचे पालकमंत्री असताना सोलापूरला लस आणण्यात पालकमंत्री अपयशी ठरल्याने त्यांना दोष दिला जात होता अशा पक्षातील काही मंडळी सोबत विरोधक पालकमंत्री बदलासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र होते.

महा विकास आघाडी च्या माध्यमातून पालक मंत्री दत्तात्रय भरणे हे काम करत असल्याने शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र थोडीशी सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आली. आपण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामावर समाधानी असून त्यांच्या बदलाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल आपण त्याबाबत बोलून उपयोग नाही असे म्हणून पाटील यांनी थोडसं भरणे यांच्या बाजूने झुकते माप दिल्याचे दिसून आले.

मागील काही काळापासून जिल्ह्यात आमदार प्रणिती शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांना पालकमंत्री करा अशी दोघांच्याही कार्यकर्त्यांची जोरदार मागणी सुरू आहे. त्यातच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे भरणे यांना पदावरून हटवल्यास प्रणिती शिंदे किंवा संजय मामा यापैकी एकाची वर्णी लागू शकते. त्यामुळेच सावध पवित्रा घेत पाटील यांनी भरणे यांना क्लीन चीट दिल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत. किंवा महाविकास आघाडीतील घटकपक्ष आहेत म्हणुन क्लिन चिट दिली आहे हे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असले तरी येणाऱ्या काही दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!