चव्हाण महाविद्यालयाच्या एन सी सी कडुन ध्वजनिधीचे संकलन ; करमाळकरांकडुन उस्फूर्त प्रतिसाद
करमाळा समाचार
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , करमाळा व 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील व कंपनी कमांडर लेफ्टनंट विश्वस्त उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटने ध्वजदिनानिमित्त ध्वजनिधीचे संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार एनसीसी कॅडेटने करमाळा शहरातून एका दिवसात 19191 ध्वजनिधी संकलन केला .

सदर निधी संकलन करताना करमाळा शहरातील व्यापारी , भाजी विक्रेते व सर्वसामान्य नागरिकांनी सढळ हाताने ध्वजनिधी दिला . सदर ध्वजनिधीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील व संस्थेचे सचिव विक्रमसिंह सूर्यवंशी ,उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक यांच्या उपस्थितीत मोजण्यात आला . सदर निधी चेकद्वारे राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान नवी दिल्ली यांना देण्यात येणार आहे . सदर निधी गोळा करण्यासाठी डॉ. विजय गायकवाड , श्री.निलेश भुसारे व एनसीसी कॅडेट यांनी परिश्रम घेतले.
