करमाळासोलापूर जिल्हा

मराठा महासंघांच्या तालुकाध्यपदी घोलप तर शहराध्यक्षपदी शिंदेंची निवड

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा तालुका मराठा महासंघाची तालुका व शहर कार्यकारिणी सोलापूर जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली करमाळा तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून दिनेश घोलप तर करमाळा शहर प्रमुख म्हणून शिवसेनेचे नेते संजय शिंदे यांची निवड करण्यात आली व करमाळा ता सचिव म्हणून लक्ष्मण गुटाळ यांची निवड करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, करमाळा तालुका व शहरातील मराठा समाजातील गोरगरीब व होतकरू तरुणांना हाताला काम व समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. कै आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत समाजातील तरुण होतकरू सुशिक्षित बेकार तरुणांना कर्ज देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही सांगितले.

यावेळी करमाळा तालुक्याचे नुतन तालुका अध्यक्ष दिनेश घोलप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, मी या पदाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण व होतकरू मुलांना हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार.

नूतन करमाळा शहर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या संजय शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, मला आज मराठा समाजातील लोकांची सेवा करण्यासाची संधी मिळाली आहे, हे मी स्वतः चे परमभाग्य समजतो आज समाजातील तरुण पिढीला फक्त वापरून बाजूला केले जाते. या वाट चुकलेल्या तरुण पिढीला पुन्हा समाजात मानाने मान मिळाला पाहिजे असे काम करणार आहे.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा उपअध्यक्ष सचिन गंगथंडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे सचिव गुरुदास गुटाळ व पंढरपूर ता प्रमुख संतोष जाधव, सतिश धनवे, पुणे विभागिय संभाजी ब्रिगेडचे प्रमुख नितीन खटके, संभाजी ब्रिगेडचे सचिन काळे, करमाळा अर्बन बँकेचे संचालक जितेंद्र चांदगुडे, कपिल यादव, कृष्णा फुटाणे, सागर पिसे, अमोल शिंदे, जयदीप शिंदे, लखन गायकवाड व ग्रामीण भागातील आबासाहेब पवार, भाऊसाहेब पवार,प्रवीण पवार,राजकुमार पडवळे, कानिफनाथ गुटाळ,अक्षय कुलकर्णी, राहुल धुमाळ हे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE