जिल्हाधिकारी आज करमाळा दौऱ्यावर ; निर्बंधाबाबत चर्चेची शक्यता
करमाळा समाचार
कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आज करमाळ्याला भेट देणार असून तालुक्यातील कोरणा संदर्भात आढावा घेणार आहेत. तरी या संदर्भात आरोग्य विभाग व इतर विभागांत सोबत तहसील कार्यालय येथे बैठकीचे नियोजन असून पुढील कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तरी जिल्हाधिकारी करमाळा येथे पोहोचले असून बैठक सुरु आहे.
इतर ठिकाणी तपासण्या झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांनी आपला मोर्चा करमाळा कडे वळवला आहे. या ठिकाणी कोरोना काळात आरोग्य विभागातील काही कर्मचारी रजेवर आहेत व करोना वाढीचा दर वाढत चाललेला आहे अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी शंभरकर काय सूचना देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संचारबंदी लागू करून व कडक निर्बंध लादून तब्बल सात दिवस होत आले आहेत. पुढे निर्बंधावर चर्चा यावेळी बैठकीत होण्याची शक्यता आहे. नेमके या बैठकीत होणाऱ्या होणाऱ्या निर्णयांवर येणाऱ्या दिवसांमध्ये निर्बंधावर निर्णय घेणे सोपे राहणार आहे. तरी आजची बैठक निर्बंध याबाबत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.