करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

सायकांळी साडे सहाच्या सुमारास चोरलेल्या वाळुची अवैध धाडसी वाहतुक ; ट्रकसह मुद्देमाल जप्त

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील आवाटी सालसे रस्त्यावर अवैधरित्या वाळु वाहतुक करताना परांडा तालुक्यातील एकास करमाळा पोलिसांनी पकडले असुन त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दिनांक 23/04/2021 रोजी 17:00वा.चे सुमारास मी, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोक 660 बागल, पोक 1164 जगताप असे करमाळा पोलीस ठाणे येथे हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मौजे सालसे ता.करमाळा हद्दीतील आवाटी -सालसे रोडवर एका मालट्रक मध्ये बेकायदेशीर चोरून वाळूची वाहतूक केली जात आहे. असे समजल्याने सर्वजण खाजगी वाहनाने बातमीतील नमूद ठिकाणी गेले.

काही वेळात तेथे एक मालट्रक आली. तिचा बातमीप्रमाणे संशय आल्याने आम्ही त्यास इशारा करून थांबविले. त्या मालट्रकचा नंबर एम.एच.12 के.पी. 7977 असा होता. त्यामध्ये अंदाजे 3 ब्रस वाळू होती. ती वेळ सायंकाळी 6:30 वा. ची होती. त्या मालट्रकच्या चालकास त्याचे नाव, पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव अमित शिवाजी नलवडे वय 35 वर्षे रा.रोसा ता.परांडा जि.उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे सदर वाळूच्या परवानाबाबत विचारपूस केली असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्याने चोरून वाळू आणल्याचे सांगितले. त्यास सदरची चोरून आणलेली वाळू कोठून आणली याबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.

सदर ठिकाणी मिळून आलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे.
1) 4,00,000/-रू. किंमतीची एक मालट्रक नंबर एम.एच.12 के.पी. 7977 त्याचा चेसी नंबर एम.ए.टी. 373339र्इ. 7 जे. 15248 असा असलेली जु.वा.किं.अं.2) 30,000/-रू. मालट्रक नंबर एम.एच.12 के.पी. 7977 यामध्ये अंदाजे 3 ब्रास वाळू, प्रत्येक ब्रासची किंमत 10,000/-रू 4,30,000/-रू. येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मालट्रक मिळून आल्याने तो पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी ताब्यात घेवून पंचासमक्ष जप्त केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE