आ. पडळकरांचा दौरा ठरला ; ठिकठिकाणी बैठका
करमाळा समाचार
आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौरा दिनांक 16 रोजी बुधवारी कुर्डूवाडी येथून सुरू होणार आहे. तीन वाजता करमाळा कडे येऊन नेरले गावातील साडेतीन वाजता ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा अध्यक्ष माऊली हळनवर इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. करमाळा तालुक्यातील ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी दौऱ्यामध्ये सामील व्हावे अशी माहिती अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.

त्यानंतर चार वाजता आळसुंदे फाटा येथे गुलाबराव देवकते यांच्या वस्तीवर घोंगडी बैठक होणार आहे. सालसे येथे साडेचार वाजता कार्यकर्त्यांची गाठीभेटी, पाच वाजता पांडे गावांमध्ये जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांबरोबर बैठक होणार आहे.

साडेपाच वाजता नाथा जी शिंदे यांच्या निवासस्थानी ओबीसी समाजातील बैठक कोण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता पोथरे गावामध्ये सरपंच अंकुश राव शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची घोंगडी बैठक होणार आहे. संध्याकाळी सात वाजता खांबेवाडी येथे अण्णासाहेब सुपनवर यांच्या वस्तीवर घोंगडी बैठक होणार आहे.