E-Paper

आ. रोहित पवारांनीही साजरा केला आगळावेगळा व्हॅलेन्टाइन्स डे

करमाळा समाचार

 

 

 

 

 

 

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी चौदा फेब्रुवारी रोजी व्हेलेटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजुन घेत त्यांनाच प्रेमाच्या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इतरांनी काय करावे असे आवाहनही केले आहे.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. पण देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा, त्यांच्या हक्कांचा अवमान होत असताना आज प्रेम आणि आपुलकीची सर्वाधिक गरज या बळीराजाला असल्याचं मला वाटतं. त्यासाठी आज ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त मांजरी बाजारात शेतकऱ्यांना भेटून पवार यांनी कृतज्ञतापूर्वक प्रेम व्यक्त केलं.

तुम्हीही शेतकऱ्यांविषयी असंच प्रेम व्यक्त केलं तर मलाही आनंद होईल. म्हणून ‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असला तरी अन्नदात्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यालाही एक फूल देऊन कृतज्ञतापूर्वक प्रेम व्यक्त करूयात असे आवाहनही यावेळी केले.
#valentinewithfarmers

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE