करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील पुनर्वसन, भूसंपादन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन

करमाळा समाचार 

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे अध्यक्षते खाली करमाळा मतदासंघातील पुनर्वसन, सिंचन, भुसंपादन मोबदला, दहिगाव – कुकडी – सिना कोळेगाव प्रकल्पग्रस्तांना संपादीत जमीनी चा मोबदला, उजनी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनीचे वाटप, उजनी ते सोलापूर या व अन्य प्रश्नासंदर्भात महत्वाची बैठक सोमवार दि . १५ फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली असून हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली .

जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीस भिमा कालवा मंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता तसेच पुनर्वसन व भुसंपादनचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, दहिगाव उपसा सिंचन – सिना कोळेगाव प्रकल्प व कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आदी सर्व अधिकारी वर्ग माहिती सह उपलब्ध राहणार असल्याची माहिती देखील आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE