आ. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावर पवारांचे संयमी उत्तर ; पण माघार नाही
समाचार –
सोलापूर येथील लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेत्यांमध्ये चांगलीच जिंकण्याची दिसून येत आहे त्यामध्ये पण ती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट रोहित पवारांविरोधात प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये बोलताना पवार यांचा पहिला टर्म असून त्यांच्यात अजून कोरकटपणा असल्याचे बोलले होते त्याला टक्का पडली उत्तर देण्याऐवजी रोहित पवार यांनी संयमी उत्तर देऊ विषय संपण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीही लोकसभेच्या जागेचा हट्ट मात्र सोडलेला दिसून येत नाही

काही दिवसांपूर्वी रोहित पवार हे सोलापूर येथे आलेले असताना त्यांनी सोलापूर येथील लोकसभेच्या जागेवरून कार्यकर्त्यांशी बोलताना काही वक्तव्य केली होते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आमदार प्रणिती शिंदे यांना विचारले असता. शिंदे यांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली. तर त्यांच्यात अजून पोरकटपणा आहे असेही त्या म्हणाल्या होत्या. यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी सध्या शाब्दिक युद्ध पेटले असल्याचे दिसून येत होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. पण, सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच शाब्दिक युद्ध पेटले आहे. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो” असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं होते.
याबाबत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली …
आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया!
राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता. मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती.
यावरून पवार यांनी आपली मावळ भूमिका जरी घेतली असली तरी सोलापूरच्या जागेचा हट्ट मात्र सोडलेला दिसून येत नाही. याबाबत बोलताना आपण कोणत्याही दावा केलेले नाही. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत असे सांगत लोकसभेच्या जागेवरून माघार घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे पुढे हे असेच सुरू राहील असे दिसून येत आहे.
come Rohit Pawar’s response to Praniti Shinde’s statement; But no retreat