दिलासादायक – शिक्षकांच्या दातृत्वामुळे आरोग्य यंत्रणेची ताकद वाढणार
करमाळा समाचार
तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच एकलव्य आश्रम शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या ऑक्सीजन मशीन मुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल असे दिसून येत आहे. शिक्षकांनी दिलेल्या देणगीतून या मशीन्स आणल्या आहेत. तर या दातृत्वाला तालुक्यातील नागरिक सलाम केल्याशिवाय राहणार नाही.

आज करमाळा तालुका जिल्हा परिषद, नगर पालिका व एकलव्य आश्रम शाळा येथील सर्व शिक्षक यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून देणगी स्वरूपात जमा रकमेतून 10 लिटर क्षमतेच्या 7 आक्सिजन कॉन्सरट्रेटर मशिन्स (एकूण किंमत 8,32,000/- अंदाजे) जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा.श्री अनिल कारंडेसाहेब, मा तहसीलदार श्री समीर माने साहेब, मा.मुख्याधिकारी श्रीम.वीणा पवार मॅडम, गटविकास अधिकारी मा. श्रीकांत खरात साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री. राजाराम भोंग साहेब यांच्या हस्ते स्वीकरण्यात आल्या.
यावेळी सभापती मा. गहिनीनाथ ननवरे आप्पा , उपसभापती मा. दत्तात्रय सरडे, पं. स.सदस्य मा.ऍड. राहुल सावंत, डबल उपमहाराष्ट्र केसरी मा.अतुल पाटील , मा.दत्ता जाधव व युवा नेते मा. शंभूराजे जगताप आणि करमाळा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत सर्व ऑक्सिजन कॉन्सरट्रेटर मशिन्स मा. तहसीलदार साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मा उपजिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब व न पा मुख्याधिकारी मॅडम यांनी शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
