करमाळासोलापूर जिल्हा

संभाव्य औषधांचा तुटवडा व तातडीची गरज लक्षात घेवून तहसीलदार माने यांची मदत

करमाळा समाचार 

कोरोनाच्या या महामारीमध्ये प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेवरती मोठ्या प्रमाणावर जबाबदारी आहेच. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करून सर्वसामान्य लोकांना योग्य औषधोपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी कधी शासकीय व्यवस्थेला पण मर्यादा येतात. यातूनच तालुक्यातील आरोग्य विभागामध्ये संभाव्य औषधांचा तुटवडा व तातडीची गरज लक्षात घेवून तहसीलदार समीर माने यांनी सामाजिक जबाबदारी ने वैयक्तीक रित्या रक्कम रूपये 60 हजार किंमतीच्या गोळ्या व औषधे आरोग्य विभागास आज दिल्या आहेत.

या गोळ्या-औषधामध्ये पॅरासिटॅमल टॅब, सिट्रीझन टॅब, अजिथ्रोमायसिन टॅब, व्हिटॅमीन सी टॅब, व्हिटॅमीन बी टॅब, डायक्लोफिनॅक टॅब, ॲमाॅक्सीन टॅब, ओमेप्रायझोल टॅब, ओंडामसेक्टाॅन टॅब, कफ सिरप इत्यादी महत्वाच्या औषधांचा समावेश आहे.

संबंधीत औषधांचा उपयोग हा तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक याआरोग्य विभागा मार्फत आवश्यकतेनुसार, कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षात ठेवलेल्या लोकांसाठी करण्यात येणार आहे.

तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या व औषधांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेवून आपले समाजाप्रती असलेले जबाबदारी या जाणिवेतून ही मदत केलेली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी व समाजसेवी संस्थांनी आपले योगदान याकामी देणे गरजेचे आहे.
समीर माने
तहसीलदार करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE