भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – युवासेनेची मागणी
करमाळा समाचार
करमाळा – बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांना नुकसानभरपाई मिळते मग लांडगे कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्या तर त्याची नुकसानभरपाई का दिली जात नाही असा सवाल युवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रशासनाला केला असून करमाळा तालुक्यातील पांडे आवाटी येथे भटक्या कुत्र्याच्या शेतकऱ्यांच्या शेळ्या ठार केल्या आहेत. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या कडे केली आहे.

मागील चार दिवसापुर्वी शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पांडे येथील संजय लोखंडे, दत्ता पाडुळे, पांडूरंग पाडूळे,सुनील ननवरे, बाबा भगत दत्ता राऊत सोमा लोखंडे यांच्या शेळ्या ठार केल्या आहेत आवाटी येथे देखील असाच प्रकार घडला असून सिद्धेश्वर खताळ,राहुल खताळ, श्रिराम खताळ,जयराम खताळ या शेतकऱ्यांच्या शेळ्या भटक्या कुत्र्यांनी ठार केल्या आहेत.या शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी युवासेनेकडुन करण्यात आली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी शेळी पालन व्यवसाय करतो तर काही भूमिहीन शेतकऱ्यांचा शेळी पालन हाच मुख्य व्यवसाय असतो एक बोकड किंवा पाठ दगावल्यास दहा ते पंधरा हजार रू नुकसान होते. त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात जरी शेळी बोकड ठार झाल्यास भरपाई मिळावी.
शंभू फरतडे
युवासेना तालुकाप्रमुख