करमाळासोलापूर जिल्हा

बारामती ॲग्रोला आदिनाथ देण्याला तालुक्यातील दोन मोठ्या नेत्यांचा विरोध ? ; मा. आ. पाटील यांच्या इंट्रीने राजकारण तापले

करमाळा प्रतिनिधी –

श्री अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात आता तालुक्यातील दोन मोठ्या गटांनी सक्रिय एन्ट्री घेतल्याचे दिसून येत आहे. डीआरटी कोर्टाने आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचे सांगितले होते. तर शासनाच्या नियमाप्रमाणे काही रक्कम भरून माजी आमदार नारायण पाटील यांनी सहकारी तत्त्वावर चालवावा अशी भूमिका घेतलेली असताना डीआरटी कोर्टाच्या निर्णया विरोधात आदिनाथ चे संचालक ही पुढील कोर्टात पोहोचले आहेत. याचाच अर्थ बागल व पाटील गटाचा आदिनाथ हा पवारांना देण्यात विरोध आहे असा यातून अर्थ काढला जात आहे.

सात दिवसांपूर्वी आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रोला हस्तांतरित करण्याबाबत डीआरटी कोर्टाने आदेश दिले होते. या आदेशाविरोधात बागल गटाचे तथा आदिनाथचे विद्यमान संचालक हे कारखान्याच्या माध्यमातून पुढील कोर्टात गेले आहेत. त्यामुळे त्या कामाला सध्या स्थगिती मिळाल्याचे दिसून येत आहे. तसेच आजपर्यंत आदिनाथ संदर्भात उघड विरोध न करणारे माजी आमदार नारायण पाटील यांनीही यात उडी घेतली आहे. ते आदिनाथ बचाव समितीच्या सोबत उभे राहिले व कारखान्यासाठी एक कोटी रुपये खात्यावर भरले आहे. त्यामुळे आता पाटील यांच्या भूमिकळीकडेही बँकांना लक्ष द्यावे लागणार आहे.

आजपर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी प्रशासनाकडून पवार यांच्या बारामती ॲग्रो लाही सहकार्य होणेअपेक्षीत होते व त्या पद्धतीने सत्ता जाण्यापूर्वी दोन दिवस आधी सुरू असलेले सुनवाईवर निकाल देत बारामती ॲग्रो या कारखान्याला आदिनाथ कारखाना देण्यासंदर्भात निकाल देण्यात आला होता. तर आता सत्ता बदल होताच माजी आमदार नारायण पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांचेही सहकार्य पाटील यांच्या बाजूला राहील असे लक्षात येते.

पाटील व बागल गट हे सध्या बारामती ॲग्रो ला कारखाना देण्याच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच त्यांना असे वाटत आहे की हा कारखाना सहकारी सत्ता तत्त्वावर चालू करावा अशी त्यांची इच्छा असल्याने दोघेही जरी वेगवेगळ्या रस्त्याने गेले असतील तरी त्यांचा ठिकाणा एकच असल्याचे दिसून येत आहे. पण विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे आजही तटस्थ असल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी अजून आपली आजिनाथ संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या आदिनाथ चे राजकारण भलतेच तापले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE